29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रडॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सरसावले

डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सरसावले

नियमित आढावा, पक्षाच्या नेत्यांची आता दर मंगळवारी बैठक
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या प्रचंड संघर्षातून जात आहे. त्यामागील कारणदेखील तशीच आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. आगामी काळात मुंबई महापालिकेसह इतर ठिकाणीही महापालिका निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला सातत्याने धक्का बसत आहे. कोकणात तर मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतला असून, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ठाकरे गटाने दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे. प्रमुख नेते राज्यातील संघटनेचाही आढावा घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवकांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या घडामोडींची गंभीर दखल आता उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी आता पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सातत्याने पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत. पक्षाला नवसंजीवनी मिळावी यासाठी काय-काय करता येईल, याबाबत मंथन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याची माहिती आहे. पक्षाचे नेते आता दर आठवड्याला बैठक घेणार आहेत. नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यभरातील संघटनांचा
नियमित आढावा घेणार
शिवसेना भवनात नियमित बैठका होणार असून, पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत. ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. या दौ-यातून ते कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या समस्यादेखील सोडवल्या जाणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR