लातूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात जयंतीच्या शुभेच्छा आणि भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. उद््घाटन विकास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी विकास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, दाल मिल असोचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री, व्यापारी चेंबर लातूरचे उपाध्यक्ष अशोक लोया, लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक (गट्टू) अग्रवाल, बाजार समितीचे संचालक बाळू बिदादा, रेणा साखरचे संचालक चंद्रकांत पाटील, बाजार समितीचे संचालक सुधीर गोजमगुंडे, राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, बाजार समितीचे संचालक तथा कामगार युनियनचे विभागीय सेक्रेटरी शिवाजी कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. जयंतीच्या निमित्ताने भीमा तुझ्या जन्मामुळे हे महानाट्य लातूरमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले आहे, या महानाट्यात तब्बल ४० कलाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जीवनक कार्यावर प्रकाश टाकणारी आपली कला या निमित्ताने सादर करणार आहेत.