जळकोट : प्रतिनिधी
तालुक्यातील केकत सिंदगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल मुख्याद्यापक, महाराष्ट्रातील सुप्रसद्धि साहित्यीक, तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे माजी सदस्य विलास सिंदगीकर यांची जळकोट जि.लातूर येथे शनिवार, दि . २९ मार्च २०२५ रोजी होत असलेल्या दुसरे राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आली आहे. संस्थाध्यक्ष संग्राम कदम यांनी एका पत्रकान्वये निवड पञ देऊन सत्कार करण्यात आला
जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नव प्रतष्ठिान संस्था गेल्या १० वर्षापासून शैक्षणिक सामाजिक साहित्यीक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर आहे. संस्थेने अनेक समाजोपयोगी भरीव कार्यक्रम राबविले आहेत . मागील काही वर्षापासून फुले -शाहु-आंबेडकर -अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक विचार आणि साहित्याचा प्रसार -प्रचार करीत असून त्याचाच एक भाग म्हणून हे साहित्य संमेलन घेतले जात आहे. विलास सिंदगीकर हे लेखक, विचारवंत, कवी , समीक्षक , वक्ते, आणि विशेष ते कथाकथनकार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पुरोगामी , परिवर्तनवादी विचारांचा वारसा त्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीतून हयातभर चालवित आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्य संपदेस अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दुसरे राज्यस्तरीय डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचार साहत्यि संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या सन्मानात आणखी एका सन्मानाची भर पडली आहे . त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .