परभणी : लातूर येथील रहिवासी असलेल्या डॉ. ऐश्वर्या सुनील बिर्ला यांनी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम एम.एस. नेत्र रोग (डोळ्यांचे सर्जन) एम.पी.शाह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जामनगर गुजरात येथुन उल्लेखनीय यश मिळवत पुर्ण केला आहे. डॉ. ऐश्वर्या यांनी एम.एस. नेत्र रोग या विषयात सौराष्ट्र युनिव्हर्सिटी गुजरात मधून पहिला क्रमांक पटकावत लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
डॉ. ऐश्वर्या यांचे वडील सुनील बिर्ला हे पोलिस निरीक्षक म्हणून किनवट येथे कार्यरत आहेत. तसेच मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामेश्वर भराडीया यांच्या त्या नात आहेत. डॉ. ऐश्वर्या यांचे १०वी पर्यंतचे शिक्षण केशवराज विद्यालय लातूर येथून पूर्ण झाले आहे. तसेच १२वी पर्यंतचे शिक्षण दयानंद कॉलेज लातूर येथून पूर्ण केले.
त्यानंतर एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण एमआयएमएसआर लातूर येथून पूर्ण केले. परंतू शिक्षणाचा ध्यास असलेल्या डॉ. ऐश्वर्या यांनी एमबीबीएस नंतर पदव्युतर एम.एस. नेत्ररोग अभ्यासक्रमासाठी जामनगर गुजरात येथे प्रवेश मिळवला. या अभ्यासक्रमात डॉ. ऐश्वर्या यांनी सौराष्ट्र युनिव्हर्सिटी गुजरात मधून प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
आपल्याला मिळालेल्या यशात कॉलेजचे सर्व प्राध्यापक मंडळी, वडील सुनील बिर्ला (पोलिस निरीक्षक किनवट), आई कल्पना बिर्ला, भाऊ सुदर्शन यांचे वेळावेळी मिळालेले मार्गदर्शन महत्वपूर्ण असल्याचे डॉ. ऐश्वर्या यांनी नमूद केले आहे. या यशाबद्दल माजी मुख्याध्यापक रामेश्वर भराडीया, आई कल्पना बिर्ला, वडील सुनील बिर्ला, भाऊ सुदर्शन, भराडीया परीवार, अॅड.दिपक मोदानी यांच्यासह नातेवाईक व मित्र मंडळीनी डॉ. ऐश्वर्या यांचे अभिनंदन केले आहे.