19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरडॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्य द्या

डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्य द्या

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसने लातूर लोकसभेची उमेदवारी उच्चविद्याविभूषित सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांना जाहीर केली, त्या क्षणापासून आम्ही कामाला लागलो आहोत. गेली अनेक वर्ष नागरीकांनी काँग्रेसला साथ दिली आहे. काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळातील माणसाशी निगडित आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्य द्या, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर लोकसभेचे इंडीया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. २७ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील औसा रोडवरील गणेश एसआर देशमुख यांच्या त्रिवेणी निवासस्थानी भेट देऊन उपस्थित महाविकास आघाडी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला, या प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, गणेश एसआर देशमुख, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, लातुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, गिरीश पाटील संभाजी सुळ, समद पटेल, संतोष देशमुख, शहाजी पाटील, सचिन बंडापल्ले, प्रभाग क्रमांक १४ चे काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय शेळके, व्यंकटेश पुरी, सुपर्ण जगताप, यशवंत वाडीकर, शिवाजी कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, विजय गायकवाड, अ‍ॅड. फारुक शेख, इमरान सय्यद, अजित चिखलीकर, संजय निलेगावकर, एल. बी.आवाळे, रामकिशन मदने, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग १४ मधील बूथ प्रमुख नागरीक, देशमुख कुटूंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले की, काँग्रेसने लातूर लोकसभेची उमेदवारी उच्चविद्या विभूषित सुप्रसिद्ध  डॉ. शिवाजी काळगे यांना जाहीर केली. त्या क्षणापासून आम्ही कामाला लागलो आहोत, गेली अनेक वर्ष  नागरिकांनी काँग्रेसला साथ दिली आहे,  डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचार कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा त्यांचे व्यक्तिमत्व सामाजिक कार्य वैद्यकीय सेवा याची सर्वांना जाण आहे. भाजप खासदार गेल्या पाच वर्षात लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात आला नाही, ते प्रचारालाही देवणी तालुक्यात आले नव्हते, काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळातील माणसाशी निगडित आहेत. विरोधकांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे, महायुतीत सध्या उमेदवारीवरुन प्रचंड गोंधळ आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राला उज्वल राजकारणाची परंपरा आहे, त्या परंपरेला शोभेल असा लातूरचा उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान निर्माण केले, देशातील स्वच्छतेचे पहिले पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे असताना लातूरला मिळाले. आता महानगरपालिकेत प्रशासक असताना जिकडे तिकडे आपल्याला कचरा पाहायला मिळतो.  काँग्रेस पक्षात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, काँग्रेस पक्षाचा परिवार खूप मोठा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा पगडा डॉ. शिवाजी काळगे यांच्या घरावर आहे. सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिरुर अनंतपाळ, लातूर, छत्रपती संभाजीनगर येथून शिक्षण पूर्ण केले. माणूस म्हणून आपला उमेदवार सक्षम आहे, त्यांना सर्व प्रश्नांची जाण आहे, आपणाला आपल्यासाठी मतदान करायचे आहे.
महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की,  कार्यकर्त्यांना आता काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळत आहे, गट तट आपापसातील मतभेद विसरुन कार्यकर्ते काँग्रेसला विजय मिळवून देतील. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे हात आपणाला बळकट करायचे आहेत, लोकनेते विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला विकासाची परंपरा दिली आहे. विकासाची ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी मला निवडून द्यावे, प्रत्येकाने मतदान करावे ही लोकसभा आपणाला जिंकायची आहे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश एसआर देशमुख यांनी केले, तर गिरीश पाटील,  प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, संजय निलेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR