25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रडोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन

डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन

लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचले!

अहमदनगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. भाजपच्या सुजय विखेंचा पराभव करून शरद पवार गटाचे निलेश लंके हे जायंट किलर ठरले. तर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरून टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे.

अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हीडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. त्यानंतर संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते.

इंग्रजीत बॅनर लावून टीकेला उत्तर
आता निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयासमोर इंग्रजीत बॅनर लावून एकप्रकारे टीकेला उत्तर दिले आहे. या बॅनरवर ‘आय निलेश ज्ञानदेव लंके, डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. आता या बॅनरवरून लंके समर्थकांकडून काय प्रत्युत्तर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR