28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeलातूरतंबाखूच्या कारणावरून पोलिस ठाण्यासमोर खून

तंबाखूच्या कारणावरून पोलिस ठाण्यासमोर खून

लातूर : प्रतिनिधी
भिक मागून जगणा-या व रस्त्यावर कोठेही झोपणा-या एका व्यक्तीचा तशाच पद्धतीच्या एका व्यक्तीने झोपेतच दगडाने ठेचून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोर खून केला. प्रारंभी दोन्ही अनोळखी असताना लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मयताची व आरोपीची ओळख पटवून तात्काळ आरोपीस अटक केली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच भिकारी वाटावा अशा व्यक्तीचा झोपेतच खून झाल्याचे दि. १४ मार्च रोजी पहाटे उघड झाले. त्यास तशाच एका व्यक्तीने ठेचून ठार मारले. स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने देवीदास शेषराव सोनकांबळे (वय ५४) रा. खाडगाव रोड, प्रकाशनगर, चंद्रोदय कॉलनी लातूर यास अटक करुन खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश लिंबाजी भडके रा. खाडगाव रोड, लातूर असे या प्रकरणातील मयताचे नाव आहे. तंबाखू देण्याघेण्याच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटवून तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्याआधारे चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केलेला आरोपी देविदास शेषेराव सोनकांबळे यास क्रीडासंकुलच्या गेट समोरुन १४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली असून तो दिवसभर भिक्षा मागून खातो. दुपारी तंबाखू घेण्या-देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून मध्यरात्री चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या प्रकाश लिंबाजी भडके याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे त्याने कबूल केले.
आरोपीस पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, विनोद चलवाड यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR