36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रतनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ ;सुप्रिया सुळे आक्रमक

तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ ;सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे : प्रतिनिधी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चौकशीसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत समिती अहवालाचा निषेध व्यक्त केला आहे. ते रिपोर्ट जाळून टाका, आम्ही पीडितेस न्याय मिळवून देऊ असे म्हणाल्या.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावणा-या तनिषा भिसे या गर्भवतीला न्याय मिळणार का? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफ सेंटरमधील रुग्णांची कागदपत्रे, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, डॉक्टरांचे, रुग्णालय प्रशासनाचे आणि कुटुंबीयांचे जबाब आदी सर्व बाबींची ससूनच्या समितीकडून तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये रुग्णालय किंवा डॉक्टरांचा दोष असल्याचा कोणताच स्पष्ट उल्लेख केला नसल्याचे पोलिस प्रशासनाने ससूनच्या समितीकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथचा असा काही रिपोर्ट येऊ शकत नाही. मी या रिपोर्टचा निषेध करते. हा रिपोर्ट जाळून टाका. सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो हे तर धक्कादायकच आहे. आम्ही ते अहवाल मानत नाही. आम्ही कोर्टात जाणार असून प्रशांत जगताप भिसे यांच्या पाठीशी उभे आहेत. यावर सरकारला विचारले पाहिजे. आम्हाला महिलेला न्याय द्यायचा आहे. डॉक्टरला वाचवलं जातंय हे आता सरळ सरळ दिसत आहे. सरकार कोणाला वाचवत आहे. पण आम्ही याप्रसंगी रस्त्यावर उतरू. पण न्याय मिळवून देऊ. कुठेलेही सत्य सरकार लपवू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR