हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा ठपका
पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा दुसरा अहवाल समोर आला. या अहवालातून डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर अलंकार पोलिस ठाण्यात घैसास यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. कलम १०६ (१) नुसार घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घैसास यांच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आयुक्ताना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ससूनच्या अहवालात डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यावरुन आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तनिषा भिसे यांना चार तास ताटकळत ठेऊन त्यांच्यावर उपचार केला नाही. त्यामुळे पुढची परिस्थिती उद्भवल्याचे या अहवालात म्हटले आहे. डॉ. घैसास यांनी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याचे या अहवालात म्हटले आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले. या प्रकरणात डॉ. घैसास यांची भूमिका निष्पण झाली आहे. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्तांनी सांगितले.