35.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeलातूरतब्बल १६ लाखांच्या सोयाबीनची चोरी

तब्बल १६ लाखांच्या सोयाबीनची चोरी

लातूर : प्रतिनिधी
पोलीस ठाणे औसा हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका गोडाऊन मध्ये ठेवलेले शेतक-यांचे तब्बत १०० क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. परंतु औसा पोलीस ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले पूर्ण सोयाबीन अवघ्या २४ तासात परत मिळाले.
लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाणे हद्दीत एमआयडीसी मधील गोडाऊन मधील ४ लाख ३९ हजार २०० रुपयांच्या १०० क्विंटल सोयाबीनची चोरी झाली होती. अज्ञात चोरटे २०० कट्टे सोयाबीन दोन वाहना मध्ये टाकून चोरटे पसार झाले होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, (औसा)कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सोयाबीन चोरणा-या चोरांबद्दल पोलिसांनी गुप्त माहिती मिळवून २०० कट्टे सोयाबीन आणि एक आयशर टेम्पो व एक बोलेरो जीप जप्त केली आहे.
नमूद चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नामे अभिषेक सुहास यादव, वय २१, वर्ष रा. वसवाडी, पाखरसांगवी ता. जि. लातूर, अभय अवधूत भोळे, वय २२ वर्ष, रा. वसवाडी, पाखरसांगवी ता. जि. लातूर, मनोज राजू खताळ, वय २२ वर्ष, राहणार माऊली नगर, पाखरसांगवी तालुका जिल्हा लातूर, हनुमंत भैरवनाथ मुंडे, वय ३९ वर्ष, राहणार टाकळी शिराढोण जि. धाराशिव, यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी चोरी झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात कारवाई करत चोरीला गेलेलं सोयाबीन शेतक-यांना परत मिळवून दिले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून चोरी गेलेल्या सोयाबीनची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते परत केले जाणार आहे. सोयाबीनची चोरी करणा-या टोळक्याला बेड्या ठोकल्या असून २४ तासातच चोरीचा माल हस्तगत करण्यात औसा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे व औसा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाध  व सहायक फौजदार कांबळे पोलिस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद तुमकुटे, चामे, पाटील, भंडे, मगर यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR