17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरतरुणांना रोजगार देण्याचे शाश्वत स्त्रोत मांजरा परिवार

तरुणांना रोजगार देण्याचे शाश्वत स्त्रोत मांजरा परिवार

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून उद्ययास केलेला मांजरा परिवार आज लातूर जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान देत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधा-यांनी रेल्वे बोगी कारखान्यातून एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याची बतावणी केली होती. परंतू, गेल्या ७ महिन्यांत या बोगी कारखान्यातून एकाही रोजगाराची निर्मिती झाली नाही. या उलट मांजरा परिवाराने हजारों रोजगार निर्माण करुन तरुणांच्या हाताला काम दिले. म्हणुनच तरुणांना रोजगार देण्याचे शाश्वत स्त्रोत म्हणून मांजरा परिवाराकडे पाहिले जाते. त्यामुळे आगामी काळातही मांजरा परिवाराशी आपले नाते कायम राहिल, अशा विश्वास माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर तालुक्यातील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकुरगा येथील शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दि. १६ ऑगस्ट रोजी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी एकुरगा येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, ट्वेन्टी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, बँकेचे सर्व संचालक, जिल्हा बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवुन शेतक-यांना अडचणीत आणीत आहे. शेतक-यांच्या पदरात चार पैसे पडणार, अशी परिस्थिती निर्माण होताच केंद्र सरकार आयात-निर्यातीच्या धोरणात लगेच बदल करते. त्यामुळे शेतक-यांच्या शेतीमालाला भावच मिळत नाही. या उलट शेतक-यांच्या ऊसाला मांजरा परिवाराकडून सर्वाधिक भाव दिला जातो. इथेनॉल निर्मिती कायम सुरु राहिली असती तर शेतक-यांना आाणखी चार पैसे देता आले असते, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने साडे सहा लाख टन ऊसाचे गाळप केले. २०० रुपये प्रमाणे तेरा-साडेतेरा कोटी रुपयांचे रक्कम मांजरा कारखान्याने नफ्यातून शेतक-यांना दिले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात क्रमांक एकची बँक आहे, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, जिल्हा बँक कल्पवृक्ष आहे. तुम्ही स्वप्न बघा, आम्ही बँकेच्या माध्यमातून तुमचे स्वप्न पुर्ण करु. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जिल्हा बँकेने २५ हजार महिलांचे खाते काढले. विशेष म्हणजे महिलांकडून एक रुपायाही न घेता त्यांचे खाते काढले. राष्ट्रीयकृत बँकांत महिलांना खाते काढण्यासाठी १५०० रुपये लागतात. परंतु, जिल्हा बँकेने एक रुपयासुद्धा घेतला नाही. बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपयांची ओवाळणी बहिणींना अगोदरच देऊन टाकली, असेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.
प्रारंभी माजी मंत्री त्र्यंबक भिसे, कृऊबाचे सभापती जगदीश बावणे, धनंजय देशमुख, श्रीशैल उटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लातूर जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाट, अशोक गोविंदपूरकर, व्यंकटराव बिरादार, स्वयंप्रभाताई पाटील, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, अ‍ॅड. राजकुमार पाटील, मारोती पांडे, अनुप शेळके, अनिताताई केंदे्र, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. सुत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केलीे.  या कायक्रमास सावरगाव, धानोरी, टाकळी, एकुरगा, चाटा, भोयरा, ढाकणी, निवळी, अंकोली, खंडापूर, चिचोलीराव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR