अहमदपूर : प्रतिनिधी
मलेशिया येथील कॉलालंमपुर येथे दि.२ ते ५ सप्टेंबर दरम्यान ऑलीम्पीक काऊन्सिल ऑफ मलेशिया द्वारा आयोजीत आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेअंतर्गत एशियन कॅडेट कप २०२४ करीता फेंंिसग असोशियशन ऑफ इंडिया कडून भारतीय संघात निवड झालेल्या जानवी जाधव व वैभवी माने यांच्या टीमने देशासाठी सिल्वर मेडल पटकावले आहे.
यामध्ये अहमदपूर येथील जान्हवी गणपतराव जाधव ,वैभवी प्रशांत माने, खुशी खुशी -हरियाणा ,बेनी रीबा -छत्तीसगड या आपल्या चार भारतीय मुलींनी धडाकेबाज कामगिरी करीत देशाला रौप्य पदक मिळवून दिले आहे. भारतीय खेळाडू जान्हवी आणि वैभवी यांचे अभिनंदन भारतीय व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज बंटी पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे मार्गदर्शक छत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी राजेजाधव, उपाध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव प्रा. डॉ. उदय डोंगरे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, मार्गदर्शक जीवनगौरव पुरस्कार विजेते गणपतराव माने, प्रा.दत्ता गलाले ,प्रा.अभिजीत मोरे, इंडीया कोच तुषार आहेर, क्रीडा शिक्षक संतोष कदम , मु.अ. प्रशांत माने , ज्ञानोबा भोसले , ठकर कोच मोसिन शेख , ठकर कोच आकाश बनसोडे ,वजीरोद्दिन काझी, डॉ.रोहत गलाले, वैभव कज्जेवाड , सूरज कदम ,भाऊराव कदम, बबलू पठाण यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.