25.4 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeलातूरतलाठ्यास शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी

तलाठ्यास शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी

निलंगा  : प्रतिनिधी
निलंगा तालुक्­यात वाळू माफीयाची मुजोरी वाढली असून सदर वाळू माफीयाविरुध्­द जोरदार मोहीम तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सुरु केली आहे. वाळू माफीयाविरध्­द कार्यवाही करण्­यासाठी विविध पथके स्­थापन केली. होसूर सज्जाचे तलाठ्यास माफीयाने शिबीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
वाळूमाफीयावर कारवाई करण्यासाठी पथके दिवसरात्र फिरुन अवैध उत्­खनन व वाहतूकीविरुध्­द कार्यवाही करीत आहेत. अशाच एका प्रकरणी होसूर ते चिंचोंडी रोडवर खंडू उत्­तम शामगीरे हे ट्रॅक्­टर क्रमांक एच-२४ ५६ व्­दारे अवैध वाहतूक करीत असताना चौकशी केली असता होसूर सज्­जाचे तलाठी कांबळे राजू यांनी सदर ट्रॅक्­टर ट्रॅक्­टर तहसील कार्यालय निलंगा येथे लावण्­यास सांगीतले असता ट्रॅक्­टर मालक खंडू उत्­तम शामगीरे रा.चिचोंडी याने सदर तलाठ्यास
शिवीगाळ करुन जिवे मारण्­याची धमकी देऊन ट्रॅक्­टरमधील वाळू खाली टाकून पळून गेला आहे.
या बाबत तलाठी कांबळे राजू पुंडलिकराव यांनी संबंधितावर औराद पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्­यानुसार त्­यांच्याविरुध्­द भादंस १८६० मधील कलम  ३५३,३७९,५०४,५०६ व गौणखनिज अधिनियम २०१३ चे  कलम ४८ (७) (८) अन्­वये गुन्­हा  नोंदविण्­यात आला  असून अधिक चौकशी औराद ठाण्याचे सपोनी विठ्ठल दूरपडे हे करीत आहेत.  तसेच दुस-या एका प्रकरणात कर्नाटक राज्­यातून वाहतूक करुन कासारशिरसी (ता.निलंगा) येथे अवैध वाळू टाकून उभ्­या असलेल्­या टीप्­पर क्र. के.ए.५६-८४३९ ची चौकशी केली असता ड्रायव्­हर सिध्­दू नागया स्­वामी रा. बसवकल्­याण यांचेकडे सदर  वाळूबाबत कसलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे संबंधिताविरुध्­द भादंस १८६०चे  कलम ३७९,३४ व गौणखनिज अधिनियम २०१३ चे  कलम ४८ (७) (८) अन्­वये गुन्­हा नोंदविण्­यात आला  असून अधिक चौकशी पोलीस ठाण्याचे सपोनी शेख  हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR