21.7 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeराष्ट्रीयतांदूळ, साखर, गहू निर्यातीवरील बंदी कायम राहणार

तांदूळ, साखर, गहू निर्यातीवरील बंदी कायम राहणार

नवी दिल्ली : देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारने अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी उठवली जाणार नाही, अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. अर्थसंकल्पापूर्वीच सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे.

गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदीबाबत सरकारने पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की, या खाद्यपदार्थांच्या निर्यातीवरील बंदी सध्या उठवली जाणार नाही. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही. देशात गहू आणि साखरेची पुरेशी उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. त्याच्या आयातीची गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडे निर्यातबंदी हटवण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. देशांतर्गत मागणीमुळे गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. आमच्याकडे त्यांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. आमच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्यांची आयात करण्याचीही गरज नसल्याचे गोयल म्हणाले. भारताने मे २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै २०२३ मध्ये गैरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर २०२३ मध्ये साखर निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली होती. याशिवाय भारत आटा आणि भारत दालही स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR