27.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeताडोबातील आठ वाघिणी स्थलांतरित करण्यात येणार

ताडोबातील आठ वाघिणी स्थलांतरित करण्यात येणार

चंद्रपूर : प्रतिनिधी
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून यापूर्वी पाच वाघिणीला ओडिसा आणि महाराष्ट्रातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले होते. आता पुन्हा आठ वाघिणींना स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे.
वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष वाढले तसेच मागील चार वर्षात वाघांच्या झुंजीत आठ वाघांचा मृत्यू झाला. काही वाघ गंभीर जखमी झाले. दोन वाघांच्या झुंजीत कोर क्षेत्रातील दोन तर बफर क्षेत्रातील सहा वाघांचा मृत्यू झाला. हे टाळण्यासाठी व वाघांच्या सुरक्षित अधिवासासाठी स्थानांतरित करणे हाच उपाय आहे. मागील दोन वर्षांत ताडोबातील पाच वाघिणींना स्थानांतरित करण्यात आले.
ओडिसातील सिम्बलीपाल येथे दोन मादी आणि अन्य प्रकल्पांत तीन वाघ स्थानांतरित करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन वाघ आहेत. मात्र, एकही वाघीण नाही. वाघांची संख्या वाढविण्यासाठी मादी वाघांची गरज आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबातून दोन ते तीन वर्षे वयोगटातील आठ वाघिणींची मागणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने केली आहे. सध्या त्यातील दोन वाघिणींच्या स्थलांतरणासाठी केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR