मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून मंत्री नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली जात आहे. शिवसेना पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामध्ये आता कपात करण्यात आली आहे, तानाजी सावंत मंत्री असताना त्यांच्या सुरक्षेसाठी ४८ सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र आता ते मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजवळ एकच सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे. आज राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारने धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यावळेस त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस दलातील ४८ सुरक्षारक्षक तैनात करून घेतले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. आमदार असल्याने केवळ आता एकच सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.