24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमुख्य बातम्यातालिबानला रशियाची मान्यता; अमेरिकेसह पाकला डोकेदुखी

तालिबानला रशियाची मान्यता; अमेरिकेसह पाकला डोकेदुखी

मॉस्को : वृत्तसंस्था
भारताचा जवळचा मित्र असलेल्या रशियाने घेतलेल्या एका निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने सांगितले की, रशियाने त्यांच्या राजवटीला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकेसह पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे.

तथापि, तालिबानला मान्यता देमारा रशिया पहिला देश बनला आहे. चीन आणि पाकिस्तानसह इतर अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये तालिबानचे राजदूत आहेत, परंतु त्यांनी या देशाला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्यात काबूलमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. मुत्ताकी यांनी ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, हा धाडसी निर्णय इतरांसाठी एक उदाहरण असेल. आता आम्हाला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, रशिया पहिला देश ठरला आहे.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का : रशियाचा निर्णय पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वैर सर्वश्रुत आहे. तालिबान अधिक मजबूत झाला, तर पाकिस्तानचा प्रादेशिक प्रभाव कमकुवत होऊ शकतो. कारण, आता अफगाण सरकार रशियाच्या माध्यमातून उर्वरित जगाशी थेट संबंध निर्माण करू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR