21.4 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रतुकाराम मुंडे यांची वर्षभरात पुन्हा बदली

तुकाराम मुंडे यांची वर्षभरात पुन्हा बदली

राज्यातील ७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची फक्त वर्षभरातच सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले धीरजकुमार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले असून केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही. राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव आणि रणजित कुमार यांची यशदाच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे मात्र वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
राज्याच्या आयटी विभागाच्या संचालक निमी अरोरा यांची सह आयुक्त राज्य कर विभाग मुंबई येथे तर पाणीपुरवठा विभागाचे उप सचिव अमन मित्तल यांची मित्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR