22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरतुझ्या नावाचं गोंदण हातावरी गं मिरवीनं

तुझ्या नावाचं गोंदण हातावरी गं मिरवीनं

लातूर : प्रतिनिधी
‘हास्यधारा’ कवी संमेलनात कवि प्रशांत मोरे यांनी एका कुंकुवापाई दूर मैना उडून जाईन, राघू एकाला राहिन याद मैनेची येईन, दोन दिसाची संगत साथ सोडून जाईन दिनाला वात राघू झुरेल आठवणीची भयान रात, तुझ्या नावाचं गोंदण हातावरी गं मिरवीनं याद येता तुझी मैना हात मायेने फिरवीन, वरात येता दारी मैना जिव्हा तीळ तुटेल गं जिवला जिव देईना रात जिवलग कुठं भेटेल गं, भोळया मनाची गं मैना रूप डोळयात कोरलं, तुझं लगीन ठरलं मन राघूचं झुरलं, अशी प्रेम, विरहाची आणि एकले पणाची, प्रियसीच्या आठवणीत झुरणारी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भव्य महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने १०० व्या नाटय संमेलन लातूर येथे होत आहे. दयानंद सभागृहातील क.ह. पुरोहित नाट्यगृहात रविवारी ‘हास्यधारा’ या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन रामदास फुटाणे यांनी केले. या कवी संमेलनात नितीन देशमुख, प्रशांत मोरे, भरत दौंडकर, अरुण पवार, आबा पाटील, इंद्रजीत घुले, गुंजन पाटील हे कवी सहभागी झाले होते.
कवि भरत दौंडकर यांनी गोफ आली गळयात या कवितेतून ५० एक्कर असलेली जमिन आज गुंठयावर आली सांगताना गुंठा गुंठा विकून  आज गोफ आली गळयात, पण एक प्लेट मातीचा वास हंूगायला उद्या रक्त येईल डोळयात, काळया आईच्या तळतळीचा हा दागीना किती दिवस जाईल, हाच सोन्याचा हार उद्या गळयातला फास होईल, जन्माच्या सातबा-यावर बोजा चढला काय आन् उतरला काय जित्या माणसाचा बघा ना येथं किती फेरफार झालाय अन् कागदाच्या तुकडयासाठी काळजाच्या तुकडयानंवर किती वेळा वाद झालाय ही जमिनीच्या तुकडयावरूनच्या कवीतेने सर्वाना अंतरमुख केले. कवी आरूण पवार यांनी वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं दोघांची वाटणी अन् माय परसात बाप गोठयाचा धनी ही वास्तव दर्शवनारी वाटणी ही कविता सादर केल्याने वाटणीवरून आई-वडिलांची होणारी दशा चित्रीत केली आहे.
कवि आबा पाटील यांनी माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत असीच हसत राहा मोनालिसा, छान दिसतेस तुला हसताना पाहून मलाही बरं वाटते तुझं हासणं भाकरी इतकं बरं वाटतं, जरा धिर मोनालीसा मिच उलगडेन तुझ्या हासण्याचं गुढ तुझ्या एकटीच्या कानात आडराणात ज्या आडरानात गळफास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं अन् आई कापरासारखी उडून गेली या धक्यानं कर्जाचा शेवटचा हप्ता फिटे पर्यत अशीच हासत रहा मोनालिसा, ही मोनालिसा कविता सादर करून शेतक-यांचे वास्तव सांगणारी कविता सादर करून अंतरमुख केले. कवयत्री गुंजण पाटील यांनी कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं कुणाला कधी काय खुपते कुठे फक्त धुर उठतो अन् तिथे काळीज जळतं खरंच सांगते या मुलींना सारेच कळते, ही कविता सादर करून फेब्रुवारी मध्ये येणा-या व्हॅलेनटाईन डे ची आठवण करून देत मुलं प्रेमासाठी काय-काय करतात याचे चित्र उभा करणा-या कवितेने उपस्थितांचा प्रतिसाद मिळवला.
कवि इंद्रजित घुले यांनी लग्नातलं जेवन या कवितेत प्रत्येत लग्नात जेवन करून प्रेमाचा ढेकर देणा-या प्रियकरावरची कविता सादर हास्य कवीतेतून तरूणांचे वास्ताव चित्रण मांडले. कवि नितीन देशमुख यांनी तू सुगीसी वैर केले वारवरा अन् उंबारा माझ्या घराचा दिन झाला… निघतात संसदेतून गाडी भरून स्वप्ने रस्त्यामध्येच जाती का गळून स्वप्ने आले विमान आले आश्वासने उतरली गेली उडून आमच्या गावावरून उडून स्वप्ने या कवीतेतून एक तर पिकत नाही, पिकलं तर खपत
नाही खपलं तर भाव भेटत नाही  अशी शेतमालाच्या संदर्भाने कविता सादर करताना संसदेतून येणा-या स्वप्नावत योजना गावापर्यत कशा पध्दतीने येतात त्याचे वास्तव  मांडले. या कवि संमेलनाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले. यावेळी कवी योगीराज माने, प्रदिप पाटील खंडापूरकर, अमोल गोवंडे, जयदरथ जाधव, दिपक वेदपाठक, रूपेश सुर्यवंशी, तेजरी घवले आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR