24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रतुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले

तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले

परळी : प्रतिनिधी
खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले असे मिश्किल वक्तव्य भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळी येथील महायुतीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असे सगळ्यांना वाटत होते. त्यामुळेच असे झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते.

पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असे वाटत आहे. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असे सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असे सगळे यांचे चाललेले. घ्या मग आता, आले मी परत तिथेच… खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले’

दरम्यान, पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR