लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात तुरीची आवक सुरु झाली आहे. नवीन तुरीची आवक सुरु होताच दरात मोठी घसरण झाली असून सध्या चांगल्या तुरीला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील महिन्यात तुरीचे दर जवळपास १० हजार रुपये प्रतिक्विंटल होते. नवीन तुरीची आवक सुरु होताच दरात घसरण सुरु झाली आहे. सध्या आडत बाजारात दाररोज ४ हजार क्विंटल तुरीची आवक होत असून दर घसरणीमुळे शेतक-यांमध्ये नाराजीचा सुर आहे. उत्पादन खर्चावर याचा परिणाम झाला आहे. शेतकरी चिंतेत आहेत.