23.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमुख्य बातम्यातेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे; १० आमदारांची बैठक

तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे; १० आमदारांची बैठक

हैदराबाद : वृत्तसंस्था
काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसे पक्षातील आमदारांमध्ये वाढत असलेला असंतोष शमविण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सरकारमधील सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आपला दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिका-यांना या बैठकीत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पक्षामधील असंतोष अधिकच गंभीर पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे. १० या हे १० आमदार काही मंत्र्यांमुळे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्याबद्दलची तक्रार कॉँग्रेस हायकमांडकडे देखील करण्यात आली आहे. जर का या १० आमदारांनी आपला पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना तेलंगणामध्ये ऑपरेशन लोटसची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तेलंगणा मधील कॉँग्रेस सरकार संकटात सापडले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंदर रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंती माधव रेड्डी आणि बीरला इलैय्या यांचा समावेश होता. काँग्रेसच्या काही आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर अंतर्कलहाच्या चर्चा लपवण्याचा प्रयत्न करताना नागरकर्नूलचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, ही केवळ डिनर मिटिंग होती. विरोधी पक्षांनी विनाकारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR