22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतैवान बळकावण्याचा चीनचा प्रयत्न!

तैवान बळकावण्याचा चीनचा प्रयत्न!

युद्धाभ्यासाच्या आडून तैवानला घेरले

 

शांघाय : वृत्तसंस्था
चीनने शुक्रवारी तैवानच्या आजूबाजूला युद्धअभ्यास सुरु केला आहे. चीनचा तैवानवर डोळा असून त्याला अनेक भाग गिळंकृत करायचे आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसात तैवानमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी यामुळे चीन संतापला आहे. याच दृष्टीकोनातून हा युद्धअभ्यास सुरु केला जात आहे. चीनने तैवानला चारही बाजूने घेरले आहे. या घटनेद्वारे चीनने तैवान आणि सा-या जगाला इशारा दिला आहे.

तैवानच्या नव्या अध्यक्षांनी पदाची शपथ घेतली आहे. या कृतीला विरोध म्हणून चीन ही दादागिरी दाखवत आहे. या युद्धअभ्यासामध्ये एअर फोर्स, रॉकेट फोर्स, नेव्ही, आर्मी आणि कोस्टगार्ड यांचा समावेश आहे. चीनने तैवानच्या पाच ठिकाणांना लक्ष्य केले आहे. ही सर्व ठिकाणे चीनच्या मुख्य भूमीपासून जवळच आहेत.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, महत्त्वाचे भाग मिळवण्यासाठी आम्ही आमची शक्ती अजमावून पाहत आहोत. आमचे अंतिम ध्येय तैवानचा ताबा घेण्याची आहे. तैवानच्या जनतेचे सध्या चीन विरोधी अध्यक्षांना पदावर बसवले आहे. याचाच राग चीनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला २०२७ पर्यंत तैवानला सामावून घेण्याची तयारी करा असे आदेश दिले आहेत.

तैवानचे नवे अध्यक्ष ताई चिंग-ते यांनी उघडपणे चीन सरकारवर टीका केली आहे. आमच्या देशाची अखंडता आणि स्वतंत्रतेच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, तैवानने सुद्धा वायुसेना, नौसेना आणि लष्कराला अलर्टमोड वर ठेवले आहे. तैवान आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहेत.

चीनची ही दादागिरी थेट अमेरिकेला आव्हान असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेने वारंवार तैवानच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. भविष्यात अमेरिकेने खरेच तैवानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिका बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. अशावेळी जागतिक राजकारणात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR