शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
वलांडी येथे घडलेल्या प्रकरणाबद्दल जाहीर निषेध करून त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी याबाबतचे निवेदन ंिहदू खाटीक समाज संघटना शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या वतीने तहसीलदार शिरूर अनंतपाळ व तसेच पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ यांना देण्यात आले. वलांडी ता.देवणी येथे अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी अटक झालेल्या आरोपी अधिकाधिक दिवस पोलीस कस्टडी झाली पाहिजे व आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून समाजामध्ये अन्य कोणीही असे कृत्य करण्याअगोदर हजार वेळा विचार करेल,असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर महादेव टोंम्पे, संतोष गंगणे, विठ्ठल सांडवे, महेश विजापुरे, जगन्नाथ गंगणे, बालाजी सांडवे, गजानन पांचाळ,नवनाथ गंगणे, भागवत माडे, लक्ष्मण घोलप, ज्ञानोबा गंगणे,नरहरी काटवटे, ंिलंबराज गंगणे, पंडीत साबने,रवि गंगणे,ऋषी गंगणे, अशोक गंगणे,माधव खटके, पवन गंगणे यांसह ंिहदू खाटीक समाज संघटना शिरूर अनंतपाळचे पदाधिकारी व समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.