थरथरणा-या हातांनी आत्मसात केले केशकर्तनाचे कौशल्य!

सतीश टोणगे
कळंब : स्वत:ची कामे करताना थरथरणारे हात जेव्हा अन्य मुलींचे केशकर्तन करायला लागतात, तेव्हा फार मोठा बदल घडलेला असतो. असाच बदल घडला आहे, तो कळंब येथील स्वआधार गतिमंद मुलींच्या बालगृहात. गतिमंद मुलींनी केशकर्तनाचे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे संस्थाचालकांची एक मोठी चिंता दूर झाली आहे. बालगृहातील अन्य गतिमंद मुलींचे केशकर्तन आता या मुली करू लागल्या आहेत.

तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात निवासी असलेल्या १२१ अनाथ व गतिमंद मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून स्वआधार पार्लर हा कौशल्याधारित उपक्रम सुरू करण्यात आला. मुलींनी केशकर्तनाचे कौशल्य आत्मसात केल्याने हे शक्य झाले. बालगृहातील मुलींचे केस कापण्यासाठी पूर्वी बाहेरून पुरुष न्हावी बोलवावे लागत होते. निवासी मुलींच्या सुरक्षिततेचा आणि वर्तनातील संवेदनशील बदलांचा विचार करून संस्थेने या समस्येवर शाश्वत उपाय शोधला. त्यातूनच स्वआधार पार्लर ही संकल्पना आकाराला आली. दैनंदिन कामे करण्यातील अडचणींवर मात केलेल्या या मुलींनी आता व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याकडे एक पाऊल पुढे टाकले.

संस्थेतील दोन प्रशिक्षित शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. वातानुकूलित व सुसज्ज पार्लरची व्यवस्था करून आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. एक ते दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर ७ ते ८ मुलींनी केस कटिंग, थ्रेडिंग तसेच इतर मूलभूत पार्लर कौशल्ये आत्मसात केली. त्या आता आत्मविश्वासाने व कुशलतेने सेवा देत आहेत.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश केवळ कौशल्य विकास नसून, मुलींमध्ये व्यवहारज्ञान विकसित करणे हाही आहे. पार्लरमध्ये कटिंग करवून घेतल्यानंतर संबंधित कर्मचा-यांकडून ठराविक मानधन दिले जाते. त्यातून मुली स्वत: पैसे स्वीकारणे, उरलेली रक्कम परत देणे, नोटांची ओळख पटवणे, हिशेब ठेवणे आणि जमा रक्कम तपासणे यासारखी मूलभूत आर्थिक कौशल्ये आत्मसात करत आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असून स्वावलंबनाची जाणीव अधिक दृढ होत आहे.

मुलींच्या सुरक्षिततेसह
कौशल्यवृद्धीचा भाग
स्वआधार पार्लर हा उपक्रम मुलींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यवृद्धी आणि साक्षरतेस चालना देणारा ठरत आहे. संस्थेच्या सर्वांगीण पुनर्वसन प्रयत्नांमध्ये हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

बालगृहातील मुलींसाठीच पार्लर
स्वआधार पार्लरमध्ये मानसिक वर्तनात बदल झालेल्या मुलींचे हेअर कटिंग आणि पार्लर केले जाते. कटिंग मतिमंद मुलीच करतात. त्यांना तसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अगोदर शिक्षकांना प्रशिक्षण दिले, नंतर त्यांनी मुलींना प्रशिक्षण दिले आहे. फावल्या वेळात या कामात त्या रमून जातात. बालगृहातील गतिमंद मुलींसाठीच या सेवा उपलब्ध आहेत.
– शहाजी चव्हाण, सचिव, तुळजाई प्रतिष्ठान, कळंब

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news