37.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeअंतरराष्ट्रीयदक्षिण कोरियात अग्नितांडव; २७ हजार बेघर, २८ बळी

दक्षिण कोरियात अग्नितांडव; २७ हजार बेघर, २८ बळी

सेऊल : वृत्तसंस्था
दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. यामध्ये आतापर्यंत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. कोरडे हवामान आणि जोरदार वा-यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली आहे. १३०० वर्षे जुने बौद्ध मंदिरही जळून खाक झाले आहे.

या भीषण आगीने आतापर्यंत ४३,००० एकर जमीन वेढली आहे. प्रशासनाने अँडोंग आणि इतर शहरांमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत २०० हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. त्याचवेळी, २७ हजारांहून अधिक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. कोरियाच्या इतिहासातील ही सर्वात भीषण वणवा असल्याचे म्हटले जात आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती हान डक-सू यांनी सांगितले की, शुक्रवारी ही आग लागली. आगीमुळे मोठे नुकसान होत असून आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. रात्री जोरदार वारे वाहत असल्याने जंगलातील आग विझवण्यासाठी कर्मचा-यांना संघर्ष करावा लागत आहे. सुमारे ४,६५० अग्निशमन दलाचे जवान, सैनिक आणि इतर कर्मचारी १३० हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे काम करत आहेत.

१३०० वर्षे जुने बौद्ध मंदिरही खाक
कोरिया हेरिटेज सर्व्हिसच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, उइसोंगमधील आगीत १,३०० वर्ष जुने बौद्ध मंदिर जळून खाक झाले आहे. हे मंदिर ७ व्या शतकात लाकडामध्ये बांधले होते. आग मंदिरात पोहोचण्यापूर्वीच भगवान बुद्धांची मूर्ती आणि काही महत्वाच्या वस्तू बाहेर काढल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR