मुंबई : वृत्तसंस्था
दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद इथून जवळच असलेल्या एका इमारतीच्या आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेनं परिसरात मोठा गोंधळ उडाला. प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांकडून याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.