26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रदक्षिण मुंबईत ११ मजली इमारतीत भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

दक्षिण मुंबईत ११ मजली इमारतीत भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत पुन्हा एक आगीची दुर्घटना घडली. मस्जिद बंदरमधील इस्साजी मार्गावर असलेल्या एका बहुमजली इमारतीत आग लागली. ११ मजली पन्ना मॅन्शन इमारतीच्या तळमजल्यावर आगीचा भडका उडाला. या घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे श्वास कोंडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१६ फेब्रवारी) पहाटे ही घटना घडली. सकाळी सव्वा सहा वाजता अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. काही वेळात आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्ना मॅन्शनमध्ये लागलेली आग तळमजल्यावरील कॉमन मीटर बॉक्स आणि पॅसेजमधील विद्युत तारांपर्यंत मर्यादित होती. पण, आगीमुळे इमारतीमध्ये धूर झाला होता.
मदत आणि बचाव कार्य हाती घेतल्यानंतर जवानांना बेशुद्धावस्थेत पडलेल्या महिला आढळून आल्या. महिलांचे हात आणि पाय होरपळलेले होते आणि धुरामुळे गुदरमल्याने त्या पडल्या होत्या. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्याचबरोबर सहाव्या मजल्यावर एक व्यक्ती, तर आठव्या मजल्यावर एक महिला धुरामुळे गुदरमरून पडली होती. त्यांनाही जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. साजिया आलम शेख (वय ३०) आणि सबिला खातून शेख (वय ४२) यांचा आगीत होरपळल्याने आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे जेजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. याज्ञिक यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR