20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeलातूर‘दगाबाज’ सरकारला शेतक-यांनो धडा शिकवा

‘दगाबाज’ सरकारला शेतक-यांनो धडा शिकवा

अहमदपूर : प्रतिनिधी
शेतक-यांना फक्त आश्वासने देणा-या दगाबाज सरकारला शेतक-यांनी धडा शिकवावा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले.अहमदपूर तालुक्यातील थोरेलेवाडी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतक-यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर गैरसोयीचा व तक्रारींचा पाढाच वाचला.
उध्दव ठाकरे म्हणाले की, या सरकारने शेतक-यांची नेहमीच फसवणूक करून वारंवार मते घेतली मात्र शेतक-यांना कुठल्याही पद्धतीने मदत द्यायची नाही असा उद्देश या सरकारचा दिसून येत आहे. त्यामुळेच खोटे बोलणा-या सरकारच्या विरुद्ध आमचे ‘दगाबाज रे’ आंदोलन सुरू आहे. सरकारकडून मदत जाहीर करून शेतक-यांची चक्क फसवणूक केली जात आहे, सरकारकडून मदत फक्त जाहीर केली पण आधार काही मिळत नाही. पूर्वी शेतक-यांना असेच मदतीचे आश्वासन देऊन फसवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शासनाच्या फसव्या घोषणा जाहीर करणा-या ‘दगाबाज रे’ आंदोलनासह असंख्य शेतक-यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत एवढी भीषण आपत्ती कधी आली नव्हती. शासनाकडे पैसे आहेत पण त्यांच्या गुत्तेदारांसाठी आहेत. त्यांच्या भ्रष्टाचा-यांना पांघरून घालायला हे तयार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले होते शेतक-यांचा सातबारा कोरा करू, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू, ओला दुष्काळ जाहीर करू, पिक विमा देऊ पण पिक विमा योजनेचे शेतक-यांना सहा रुपये मिळाले आहेत ही चक्क थट्टा असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, शेतकरी राजा जर सुखी, समाधानी असेल तर आपण सर्व सुखी समाधानी आहोत. सरकारने शेतक-यांना मदतीचा हात देताना पूर्णपणे उदासीनता दाखवली आहे. अशा प्रकारे शेतक-यांची थट्टा करणा-या व बोलाचा भात बोलाची कढी वरपा म्हणणा-या सरकारला उलथून टाकले पाहिजे असेही म्हणाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, लातुर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख , बालाजी रेड्डी, जयश्री उटगे, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR