पुणे : प्रतिनिधी
ग्राम परी एम. आर. ए .सेंटर पाचगणी यांचे आणि आंतरराष्ट्रीय शेतकरी संवाद संस्था यांच्या वतीने सात देशांतील सेंद्रिय शेतकरी समूहाने दयोदय गोशाळेस नुकतीच अभ्यास दौरा करून भेट दिली. यामध्ये सात देशांतून एकूण ३० सेंद्रिय शेतक-यांनी अभ्यास दौ-यात सहभाग घेतला होता. यामध्ये फ्रान्स, मेक्सिको, सुदान, केनिया, कंबोडिया, बोरुंडी, वृंडाएस या सात देशांतून दयोदय गोशाळा तसेच कुसुम बाग सेंद्रिय शेती प्रकल्प आणि इतर सामाजिक उपक्रमास भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि नानीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल दयोदय गोशाळेचे कौतुकास्पद उद्गार काढले व कौतुक केले.
दयोदय गोशाळेमार्फत एकूण ३०० गोमातांची सेवा केली जाते. यामध्ये गोमातेचे खाद्य, गोमातेचे लसीकरण, गोमातेची सुरक्षा, गोमातेची निवास व्यवस्था, तसेच गोमातेचे संरक्षण आणि रक्षण कार्य पाहून प्रभावित झाले आणि इतर सर्व बाबींचे बारीक निरीक्षण करून येथील गोशाळा आदर्श गोशाळा असल्याचे त्यांनी या ठिकाणी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी दयोदय गोशाळेचे विश्वस्त अतुल शहा व सह संस्थापिका संगीता शहा, कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण कुलकर्णी व राहुल भट यांनी गोशाळेच्या माध्यमातून माहिती व प्रशिक्षण या सर्व शेतक-यांना देण्यात आले.