धाराशिव : प्रतिनिधी
पोलिस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरून सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके यांचे पथक गुन्ह्यांप्रतिबंध करणेकरिता तुळजापुर शहरात गर्दीचे ठिकाणी पायी पेट्रोलिंग करीत असताना दरोड्याच्या तयारीत ५ इसमाना अटक केली आहे.
तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सव दरम्यान देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच शहरात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी केला आहे.
याच दरम्यान स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांना नळदुर्ग ते तुळजापुर बायपास रोडवर एका पांढ-या रंगाचे चारचाकी वाहनामध्ये काही इसम दरोडा टाकण्याचे तयारीत थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने लागलीच सदरची माहिती वरीष्ठांना कळवून पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी बायपास रोडवर सायंकाळी ७.१५वा. गेले असता तेथे त्यांना एक पांढरे रंगाची स्वीफट कार क्र. एम. एच. ११ एके ९६२१ ही दिसली पथकाने त्यांच्या गाडया थांबवुन गाडीमधुन उतरून सदर कारकडे जात असताना पथकामधील स्टाफ ला पाहुन कारमधील दोन इसम उतरून पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यांना जागीच पकडले.
तसेच कारमधील तिघांनाही पकडुन त्या पाच इसमाना त्यांचे नाव गाव व सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी सुरवातील उडवाउडवीचे उत्तरे दिली. रोहीत ऊर्फ तात्या अंकुश गायकवाड (वय ३६ वर्षे ), अमर आसाराम गायकवाड (वय २३ वर्षे रा. नळवंडी) राजेश जाधव (बीड), राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २५) ) प्रशांत दिलीप डाके (वय २५ ) हे सर्वजण बीड जिलह्यातले आहेत. या पैकी काहीजणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सर्वांना ताब्यात घेवुन त्यांचेवर तुळजापुर पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर कामगिरी पथकामध्ये पो.नि.इज्जत पवार, स.पो.नि. अमोल मोरे, स.पो.नि. सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, दत्ता राठोड, दया गादेकर, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, पो.कॉ. यादव, पो.कॉ. आंधळे, महेबूब अरब, सुभाष चौरे, विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.

