लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दर्जेदार ई-साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी उच्च माध्यमिक वर्गासाठी सामाजिक विभागात जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. डॉ. जगदाळे यांनी इयत्ता १२ वी वर्गासाठी ‘संगीत शिक्षणात विज्ञानाचा सहयोग‘ या पाठ्यघटकावर आधारित व्हिडिओ निर्माण केला होता. यासाठी १० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा पुरस्कार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडच्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती सलगर, डॉ. राजेश गोरे, डॉ. गिरीश माने, डा. जगन्नाथ कापसे, डॉ. संतोष ठाकूर, डॉ. पौळ, निशिकांत मिरखलकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा जेएसपीएम संकुल लातूर येथे पार पडला.
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत परीक्षण करताना आधुनिक तंत्र, अध्यापन शैली, वकृत्च, मांडणी, नाविन्यता, विद्यार्थी केंद्रीत आशय, अध्ययन निष्पती आदी प्रमुख बाबी विचारात घेण्यात आल्या. डॉ. संदीपान जगदाळे यांनी तबला वादन, इयत्ता अकरावी व बारावीसाठी संगीत शास्त्र विषयक व्हिडिओ, बालसंस्कार, पोवाडे, अभ्यास कसा करावा इत्यादी विषयांवर १३८ व्हिडिओ संदीप जगदाळे या युट्यूब चॅनल वर प्रेषित केले आहेत. ज्याचा लाभ ५ लाख ३४ हजार १०३ दर्शकांनी घेतला आहे. भारतीय व्यक्तीं बरोबरच यू. एस. ए., यू. के., फिलिपाईन्स, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ, न्युझीलंड, फ्रास, केनिया या देशातील संगीत साधकांनी या व्हिडिओच्या लाभ घेतला आहे. त्यांचे १० व्हिडिओ दीक्षा अॅप वर अपलोड झाले आहेत. डॉ. जगदाळे यांच्या यशाबद्दल नागेश मापारी, वंदना फुटाणे, लक्ष्मीरमण लाहोटी, अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे.