जळगाव : प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दस-याला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जात. आज मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. दस-याच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोन्याच्या दरात आज सकाळच्या टप्प्यात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल ५५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ५५० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१८,६९० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५५०० रुपयांनी घट झाली आहे. आज जास्त प्रमाणात सोन्याचे बिस्किट, नाणे खरेदी केले जाते. त्यामुळे २४ कॅरेटचे हे सोने खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे.
सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात. त्यामुळे आज २२ कॅरेटचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे कारण याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १,०८,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ५००० रुपयांनी कमी झाले आहे . हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,८८,००० रुपये मोजावे लागणार आहेत.