लातूर : प्रतिनिधी
जम्म-काश्मीर च्या पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध नागरिकांना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून लातूरच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.ज्यात पर्यटनासाठी आलेल्या २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तर अनेक पर्यटक,स्थानिक व्यावसायिक,नागरिक जखमी झाले.या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या घटनेबाबत देशभरातुन तीव्र रोष व्यक्त केला जात असून केंद्र सरकारने पहेलगाम, सह जम्मू काश्मीर मधील सर्व पर्यटन स्थळाची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करावी आणि दहशतवाद्याना धडा शिकवावा असा आग्रह काँग्रेसने केन्द्र सरकारकडे धरला आहे.
दहशतवादी हल्ले हे मानवतेवर घाला घालतात. पहलगाममधील निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांची हत्येची घटना ही प्रत्येक भारतीयांच्या मनाला अतिशय वेदना देणारी असून केंद्र सरकारने यासारख्या घटनांवर कठोर निर्णय घेण्याची आणि जशास तसे ठोस उत्तर देण्याची गरज असल्याचे मत प्रा. सुधीर अनवले यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गोरोबा लोखंडे, प्रा. सुधीर अनवले, प्रा. प्रवीण कांबळे, दगडूप्पा मिटकरी, अॅड. देविदास बोरुळे पाटील, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी, आसिफ बागवान, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, अॅड. अंगदराव गायकवाड, तबरेज तांबोळी, भाऊसाहेब भडीकर, बिभीषण सांगवीकर,जमालोद्दीन मणियार, अराफत पटेल, ख्वॉजापाशा शेख, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, नितीन कांबळे, जुनेद शेख, पिराजी साठे, मारुती चव्हाण, राहुल देशमुख, किरण बनसोडे, बब्रुवान गायकवाड, अहेमद बागवान,करीम तांबोळी, शोभाताई ओहळ यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.