28.7 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeलातूरदहशत पसरवणा-या सात टवाळखोरांना मोक्का

दहशत पसरवणा-या सात टवाळखोरांना मोक्का

लातूर : प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी अंबाजोगाई रोड परिसरात गुन्हेगाराच्या एका टोळीने किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सात आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्या सर्वांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. यात एका विधीसंघर्षगस्त बालकाचा ही समावेश आहे.
सदर टोळीतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हद्दपार, स्थानबद्धता, झोपडपट्टी दादा कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. तरीपण नमूद आरोपींमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यांनी परत किरकोळ कारणावरुन भरस्त्यात मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अजिंक्य निळकंठ मुळे (वय २८) रा. जुना औसा रोड लक्ष्मीकॉलनी लातूर, बालाजी राजेंद्र जगताप (वय २७) रा. गायत्री नगर जुना औसा रोड लातूर, अक्षय माधवराव कांबळे (वय २८) रा. दत्तकृपा सोसायटी जुना औसा रोड लातूर, एक विधीसंघर्षगस्त बालक, नितीन शिवदास भालके (वय २८) रा. आदर्श कॉलनी, लातूर, साहिल रशीद पठाण (वय २४) रा. ड्रायव्हर कॉलनी लातूर, प्रणव प्रकाश संदीकर (वय २७) रा. लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड लातूर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर टोळी विरोधात पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांनी पोस्टे शिवाजीनगर गुरनं. ८७/२०२५ कलम १०९ (१), ३०८ (५), ३११ भारतीय न्याय संहिता सहकलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९४९ या गुन्हयातील आरोपी ०१ ते ०७ यांचे विरूध्द सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा चे कलम ३(१), ३(२), ३(४) प्रमाणे कलम वाढ करणेसाठी पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्फतीने पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांना अहवाल सादर केला असता दिनांक ९ एप्रिल रोजी पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, लातूर गुरनं. ८७/२०२५ कलम १०९ (१), ३०८ (५), ३११ भारतीय न्याय संहिता सहकलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ गुन्हयातील आरोपी च्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) चे कलम ३(१), ३(२), ३(४) हे वाढीव कलम समाविष्ठ करण्याची मंजूरी देवुन सदर गुन्हयाचा तपास रणजित सावंत, उप विभाग पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या कडे देण्यात आला असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR