17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदहावीचा परीक्षा पॅटर्न बदलला; ३५ ऐवजी २० गुण मिळविणारे पास

दहावीचा परीक्षा पॅटर्न बदलला; ३५ ऐवजी २० गुण मिळविणारे पास

मुंबई : प्रतिनिधी
शाळेत लहानपणापासून गणित या विषयाचे नाव घेतले तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणिताचा फोबिया असतो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली.

दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय समोर येणार आहे.

एक म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी घातक निर्णय : हेरंब कुलकर्णी
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय घातक निर्णय आहे. आपल्याला पदवीधरांची संख्या वाढवायची आहे का? की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे हे एकदा शासनाने ठरवले पाहिजे. जागतिक प्रतवारीचे जे अभ्यास होतात त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो. २०२० साली भारत हा ३३ व्या क्रमांकावर होता. येथून पुढच्या काळात तंत्रज्ञानाच्या आधारे नोक-या मिळणार आहे.त्यासाठी गणित आणि विज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य मिळतील असा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR