35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रदहावीच्या १३ मे रोजी निकाल

दहावीच्या १३ मे रोजी निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावीच्या परीक्षाचा निकाल १३ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे. १३ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल मिळणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात निकालाची एकंदरीत माहिती दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या. त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR