मुंबई : प्रतिनिधी
दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी आणि अंडरवर्ल्डमध्ये दानिश चिकना या नावाने ओळखल्या जाणा-या दानिश मर्चंटला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. डोंगरी भागात दाऊदच्या ड्रग ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करणा-या व्यापा-याला त्याचा साथीदार कादिर फंटा उर्फ कादिर गुलाम शेख याला ही अटक करण्यात आली.
या प्रकरणात गेल्या महिन्यापासून पोलिसांची कारवाई सुरू होती. ८ नोव्हेंबर रोजी रहमानला मरीन लाइन्स स्टेशनजवळ १४४ ग्रॅम ड्रग्जसह पकडल्यानंतर अटकेची साखळी सुरू झाली. या चौकशीदरम्यान रहमानने हे ड्रग्ज डोंगरी येथील अन्सारी यांच्याकडून आणल्याचे उघड झाले. या माहितीवरून कारवाई करत एलटी मार्ग पोलिसांनी अन्सारी याला अटक करून ५५ ग्रॅम अतिरिक्त अमली पदार्थ जप्त केले.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
अन्सारीने या ड्रग्जचा पुरवठा हा दानिश मर्चंट आणि त्याचा सहकारी कादिर फंटा यांनी केल्याचा खुलासा केला. मुंबई पोलिस खूप दिवसापासून मर्चंट आणि फंटा यांचा शोध घेत होते आणि त्यांना एक गुप्त माहिती मिळाली. या गुप्त माहितीनंतर पोलिसांचे पथक डोंगरी येथे पोहोचले आणि दोघांना पकडण्यासाठी तेथे सापळा रचला. झडतीदरम्यान दानिश मर्चंट आणि कादिर फंटा या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली.