17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका

दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सत्तास्थापनेबाबत एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री मात्र त्यांच्या सातारा येथील दरे गावी होते. गेले दोन दिवस ते आजारी असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्याचे समजते. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या गावभेटीवरून टीका केली होती. त्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असे म्हणत संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.

शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते. काल त्यांचा ताप १०५ वर होता. सत्तेचे समीकरण आता निश्चित झाले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्याकडून विषय संपलेला आहे. आता गृह, महसूल किंवा इतर खात्यांबाबत महायुतीत कोणतीही भांडणे सुरू नाहीत.

एकनाथ शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा राज्यात मोठी घडामोड घडते, असे विधान शिरसाट यांनी केले होते. त्यावर आज पुन्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, दाढीला कुणीही हलक्यात घेऊ नये. दाढीने विधानसभेला आपली कमाल दाखविली. जे रोज उठून शिंदेंवर टीका करतात, त्यांना जागा दाखवली. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसला शिंदेंनी जागा दाखविली. ही ताकद दाढीमध्ये आहे. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊन नका, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

संजय राऊत हे माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत. शिंदे यांच्या प्रकृतीची काळजी करण्याऐवजी ते जादूटोण्याची भाषा बोलत आहेत. त्यांना संस्कृती आणि संस्कार नाहीत. संजय शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी केलेल्या जादूटोण्यावरच उतारा करण्यासाठी आम्ही दरे गावात गेलो होतो. बंगालच्या जादूगाराचीही जादू आमच्यावर चालली नाही, हेही राऊतांना माहीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR