17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरदिलीपराव देशमुख यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

दिलीपराव देशमुख यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर आयोजित सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मानाचा  सहकारमहर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार- २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये काम करणा-या मान्यवरांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी मराठवाडा मुक्त्ती संग्राम दिनानिमित्त दि. १७  सप्टेंबर रोजी हा सोहळा लातूर येथील दयानंद सभागृहात ह. भ. प. गहिनीनाथ महाराज, खासदार डॉ. शिवाजी काळगे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे दिल्ली,
ज्येष्टपत्रकार जयप्रकाश दगडे, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष अशोक देडे, प्रा. विठ्ठल कांगणे आदींच्या उपस्थितीत पार पडला. परंतु याच दिवशी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बाहेरगावी गेले होते. त्यांनी केलेल्या सहकारातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांची यावर्षीच्या मानाचा सहकार महर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२४ साठी निवड केली असल्याने त्यांना आशियाना बंगल्यावर जाऊन जिल्हाध्यक्ष अशोक देडे,  जिल्हा सचिव अशोक हनवते व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा. यु. डी. गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अफसर कारभारी, शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी त्यांना सन्मानित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR