32.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeदिल्लीवरील हल्ल्याचा फियास्को! पाकिस्तानी ‘फतेह’ला भारतीय ‘आकाश’ने दाखविले आसमान

दिल्लीवरील हल्ल्याचा फियास्को! पाकिस्तानी ‘फतेह’ला भारतीय ‘आकाश’ने दाखविले आसमान

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शनिवारी रात्री पाकिस्तानने दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानने दिल्लीच्या दिशेने मिसाइल सोडली होती. पण सशस्त्रबलाची सतर्कता आणि तत्परतेने त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी केला. भारताने पाकिस्तानच फतेह-१ मिसाइल पाडलं आहे.

भारताने पाकिस्तानचा हा प्रयत्न दिल्लीपासून ३०० किलोमीटर अंतरावरच हाणून पाडला. दिल्लीच्या दिशेने ही मिसाइल जात असल्याचा अंदाज आहे. सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र इंटरसेप्ट करण्यात आले. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे एक फायटर जेटही पाडण्यात आले.

पठानकोट क्षेत्रात आज सकाळी ड्रोन एक्टिविटी दिसली. एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हिमाचलच्या माजरा येथे एक मानवरहीत विमान पाडण्यात आले. पाकिस्तानने जम्मूमधील हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध आप शंभू मंदिराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाइल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पडलं. या पवित्र स्थानाचे काहीही नुकसान झालं नाही. पाकिस्तानने पंजाबच्या अमृतसरमध्ये केलेला हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

पाकिस्तान भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. पण जिथे-जिथे पाकिस्तानचे हल्ले होत आहेत, तिथे-तिथे एअर डिफेन्स सिस्टिम हवेतच पाकिस्तानी मिसाइल्सना नष्ट करत आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतात २६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाइलद्वारे हल्ले केले. भारताने प्रत्येक हल्ल्याचा सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR