दिवाळीपूर्वी दिलासा

दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना दिलासा म्हणून ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपये अग्रीम जमा करण्यात येणार आहे. या आधी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यात आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि ‘ट्रिगर १’ व ‘ट्रिगर २’ या दोन्ही निकषांचा फेरआढावा घेतल्यानंतर आणखी ४० तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे.

यामुळे आता एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून या भागातील शेतक-यांना दुष्काळासाठी घोषित केलेल्या १२ सवलतींचा लाभ मिळणार आहे. शेतक-यांच्या कृषी कर्जमाफी प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. नव्याने साडेतीन लाख शेतक-यांची यादी प्रमाणित करण्यात आली असून या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल तसेच दिवाळीच्या सणात शेतक-यांच्या हातात पैसे असावेत आणि त्यांना कुटुंबाचा खर्च भागवता यावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात केवळ ९० दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याने रबी हंगामात ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे नियोजन आहे.

शेतक-यांनी चारा पिकवल्यास तो हमीभावाने खरेदी करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, असे निर्देश जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांना देण्यात आले आहेत. शासन निर्णयातील अटींमुळे काही शेतक-यांना लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्रिमंडळाने त्या अटी काढून टाकून निर्णय सर्वांना लागू केला आहे. वीज बिल वसुलीसाठी शेतक-यांना तगादा लावू नये, असे स्पष्ट करताना नियमबा वसुली झाल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पाणीटंचाईवर कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागात टँकरची मागणी वाढत असून तेथे पाण्याची पातळी ३ मीटरपेक्षा जास्त खाली गेली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टँकरच्या वाहतुकीवर जीपीएसद्वारे देखरेख ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे १६ हजार अनधिकृत पाणी जोडण्या तोडल्या असून या पुढेही अवैध पाणीउपसा करणा-यांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्यात १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २ लाख १४ हजार ९७ पदे आहेत. या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणा-या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. शेतक-यांना सर्व प्रकारची मदत दिवाळीपूर्वी देणं शक्य नसलं तरी तातडीची आर्थिक मदत म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि पिकांच्या नुकसानीच्या दुहेरी संकटाचा सामना करत असताना सरकारने ही मदत जाहीर केली आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतक-यांना दिवाळीच्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news