मानवत : शहरातील मोंढा परिसरात असलेल्या दिव्यनगर प्रमुख रस्ता कामाचा शुभारंभ झाला आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांना नव्हे तर अडत व्यापा-यांसाठी देखील सुखकारक आहे, असे प्रतिपादन युवा नेते डॉ.अंकुश लाड यांनी केले.
मानवत येथील मोंढा परिसर व नागरी वस्ती, महावितरण मुख्य कार्यालय या सर्वांचा दुवा दिव्यनगर येथील रस्ता बांधकामाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडले. युवा नेते डॉ. लाड यांच्या हस्ते तसेच संत-महंत, व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत पार पडले. परीसरातील अडत व्यापारी व महावितरण अधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार डॉ.लाड यांनी लक्ष मंजूरी मिळवून घेतली. पुढे बोलताना डॉ. लाड म्हणाले, या रस्त्यामुळे परिसरात असणारे महावितरण कार्यालय, रसानंद पुरीजी महाराज यांचा आश्रम, अडत व्यापा-यांच्या अवजड वाहनाच्या रहदारीला फार मोठी मदत होईल. तसेच परिसरातील नागरिकांच्या रस्त्यामुळे ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आता सुकर झाल्याचे समाधान असल्याचे सांगितले.
या रस्ता उद्धघाटन प्रसंगी हभप रसानंद पुरीजी महाराज, जेष्ठ अडत व्यापारी श्रीकिशन सारडा, व्यापारी महासंघ अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब मोरे, जिनींग असोशिएशनचे अध्यक्ष गिरीशकुमार कत्रूवार, बाजार समिती संचालक रंगनाथ वावरे, महेश साखरे, गुलाबसिंग ठाकूर, दामोदर बांगड, मनोज बांगड, पंकज लाहोटी, राहुल कडतन, परमेश्वर गोलाईत, माणिकसिंग ठाकूर, भारत ठाकूर, नितीन कत्रूवार, राजूभाऊ खरात, विनोद रहाटे, दत्ता चौधरी, अभिषेक आळसपुरे, श्रीधर कोक्कर आणि बाबा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनायक कोरडे, दीपक वाघमारे, प्रधान कांबळे, श्रावण गायकवाड, बालाजी बिडवे, दादा भदर्गे, रमेश मंगल पल्ली, जावेद भाई, आसद भाई, सईद भाई, रामा विकी, नय्युम पठाण, अजिज भाई, विजय शहाणे व राहुल चिंचवड यांनी पुढाकार घेतला.