मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अनाथ मुला-मुलींसंदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अनाथ मुला-मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांगांच्या धरतीवर अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य सरकारने घेतला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी आल्यास शिक्षण संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला आणि बालविकास अधिका-याकडे शिफारस करावी, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान, अनाथ बालकांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून १०० टक्के शिक्षण आणि परीक्षा शुल्कात सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा हा अतिशय महत्वाचा निर्णय असून राज्यातील अनेक अनाथ मुला-मुलींना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शासकीय निमशासकीय शासकीय अनुदान असलेल्या संस्थांमध्ये योजना लागू राहणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दिव्यांगांच्या धरतीवर अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
अनेकदा दिव्यांगांसंबंधी बोगस प्रमाणपत्रे दिली जातात. त्यातून अनेकजण चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवितात. परंतु हे कृत्य आता उघडे पडायला लागले आहे. सातारा जिल्ह्यात ५८१ दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या सुरू आहेत. आतापर्यंत १६२ दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या झाल्या. यात आतापर्यंत २५ शिक्षक अपात्र तर ११ शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे ३६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. सातारा जिल्ह्यात दिव्यांग शिक्षकांना आरोग्य यंत्रणेने यापूर्वी दिलेली ऑनलाइन प्रमाणपत्र खोटी ठरवून आता अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा दिल्या जात आहेत. दरम्यान, या कारवाईवरून नाराजी व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, बोगस प्रमाणपत्र दिल्याचे कारण पुढे करीत काही दिव्यांगांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे प्रमाणपत्र देणा-य आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, दिलेली प्रमाणपत्रे खोटी ठरवली जात असल्याने प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दिव्यांग शिक्षकांना अपात्र कोणत्या कारणाने ठरवले याचे कारण दिले जात नसल्याचा आरोप आहे.