29.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रदिशा सालियनच्या वडिलांची आदित्य ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार

दिशा सालियनच्या वडिलांची आदित्य ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार

दिनो मोरिया, सूरज पांचोलीवरही आरोप

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आज मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आदित्य ठाकरेंसह काही पोलिस अधिकारी आणि इतर काही लोकांवर आरोप केले आहेत. त्यांनी या तक्रारीत आदित्य ठाकरेंसह दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती, सूरज पांचोलींवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी मुंबई पोलिस मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. दिशा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी यावेळी केली.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आज, आम्ही पोलिस आयुक्तालय कार्यालयात लेखी तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे आणि जेसीपी क्राईमने ती स्वीकारली आहे… यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि त्याचा सिक्युरिटी, परमबीर सिंग, सचिन वाझे आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर आरोपी आहेत…

सर्व तपशील एफआयआरमध्ये आहेत. एनसीबीच्या तपास पत्रात आदित्य ठाकरे ड्रग व्यवसायात गुंतल्याचे सिद्ध झाले आहे, त्याचा तपशील या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

तत्कालीन पोलिस आयुकेत परमबीर सिंग, सचिन वाझे आणि मालवणी पोलिस स्टेशनचे अधिकारी आरोपी असल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. शिवाय ही तक्रार एफआयआर म्हणून नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर तक्रार सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याची आहे. मालवणी पोलीस स्टेशनशी संबंधित कोणताही अधिकारी किंवा पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकार तपास करू शकत नाही, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दिशाच्या वडिलांनी मागील काही दिवसात मुलीच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. या प्रकरणाची नव्याने चौकशीची मागणी करण्यात आली. त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR