37.7 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रदिशा सालियनवर बलात्कार झाला नव्हता

दिशा सालियनवर बलात्कार झाला नव्हता

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अशामध्ये दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून त्यामधून दिशावर बलात्कार झाला नव्हता, असे या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरून राज्यातले राजकारण पुन्हा तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
दिशा सालियनवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नव्हता असे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. दिशाच्या छातीवर आणि पोटावर खरचटल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. दिशाच्या हात-पाय आणि शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या हा उल्लेख पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा दावा केला होता.
पण दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टात धाव घेत तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. मात्र आता दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR