16.7 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeलातूरदीड एकरवरील हरभरा पिकावर फिरवला नांगर

दीड एकरवरील हरभरा पिकावर फिरवला नांगर

किनगाव : वार्ताहर

रब्बी हंगामातील हरभरासह अनेक पिकांना अवकाळी पाऊस व वातावरण बदलामुळे फटका बसत असून रब्बी हंगामातील हारभरा पीक शेतक-यांच्या हातचे गेल्याने शेतक-याने निराश होऊन दीड एकर हरभरा पिकावर सोमवारी दुपारी किनगाव येथील शेतक-याने नांगर फिरवला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाच सध्याच्या वातावरण बदलाने व अवकाळी पावसाने शेतक-यांचीचिंंता वाढवली आहे. अगोदर खरीप हंगामातील पिकांचे पावसाच्या खंडाने मोठे नुकसान झाले होते.

उत्पादनात मोठी तूट येत असतांनाच सध्या अवकाळी पाऊस व वातवरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. येथील शेतकरी भागवत देवदे यांनी शेतातील दीड एकर हरबरा पिकांवर नांगर फिरवला आहे. या वातवरण बदलामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले. एक महिन्यापूर्वी रब्बी हंगामात हरभरा पीक पेरले होते. खरिपातील विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम अजून न दिल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR