नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील आयफोनचे उत्पादन सुरु झाल्यानंतर चीनने रेयर अर्थ मेटलच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. प्रामुख्याने चुंबक, बॅटरी बनविण्यासाठी या रेअर अर्थ मेटलचा वापर होतो. हे धातू नावाप्रमाणेच दुर्मिळ असतात. जगातील बहुतांश दुर्मिळ धातू हे चीन उत्पादित करतो. यामुळे आजवर जगभरातील देश चीनवर अवलंबून होते. आता चीनची ही दादागिरी संपुष्टात येणार आहे.
कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली. दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या क्षेत्रात भारताला मोठे यश मिळाले आहे. देशात ऊर्जा राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंगरौली कोळसा क्षेत्रात दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा सापडला आहे. सिंगरौली कोळसा क्षेत्रात कोळसा आणि कोळसा नसलेल्या नमुन्यांमध्ये २५० पीपीएम आणि ४०० पीपीएम आरईई आढळली असल्याचे ते म्हणाले.
भारतात हे रेअर अर्थ मेटल विपुल प्रमाणात आहेत. भारतात सुमारे ७.२३ दशलक्ष टन एवढे रेअर अर्थ मेटल आहेत. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी दुर्मिळ धातू सापडले आहेत. परंतू ते सध्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात आहेत. या शक्तीवर भारत भविष्यात जगासाठी सर्वात शक्तीशाली देश ठरू शकतो.
जगातील सुमारे ९०% दुर्मिळ पृथ्वी धातूंचे (आरईई) शुद्धीकरण आणि प्रक्रिया चीन नियंत्रित करते. परंतू, ते त्यांच्याकडे सापडत नाहीत. ते दुस-या देशातून आयात केले जातात आणि मग त्यावर प्रक्रिया केली जाते. इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बॅटरी, सौर पॅनेल, पवन टर्बाइन, मोबाईल फोन, लॅपटॉप, एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रे त्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. थोडक्यात रेअर अर्थ मेटल हा या उद्योगांचा आत्मा आहे. जगातील सुमारे ९०% दुर्मिळ पृथ्वी धातूंचे (आरईई) शुद्धीकरण आणि प्रक्रिया चीन नियंत्रित करते. परंतू, ते त्यांच्याकडे सापडत नाहीत. ते दुस-या देशातून आयात केले जातात आणि मग त्यावर प्रक्रिया केली जाते.