24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरदुसर्‍या फेरीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे २१ हजार ६७ मतांनी आघाडीवर

दुसर्‍या फेरीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे २१ हजार ६७ मतांनी आघाडीवर

सोलापूर :सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज मंगळवारी (दि. ४) रोजी ईव्हीएमवर सकाळी नऊ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मागे टाकत ५ हजार २३८ मतांची प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहर उत्तर मतदार संघात ही काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून आले.

पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना २९ हजार ५२२ मते, बहुजन समाज पार्टीचे गायकवाड यांना २२२, भाजपचे यांना राम सातपुते यांना २४ हजार २८४, वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना ४९७ मते मिळाली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीत पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मागे टाकत २१ हजार ६७ मतांची प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.
तर दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ३४ हजार ८९९ मते, बहुजन समाज पार्टीचे गायकवाड यांना २५१, भाजपचे यांना राम सातपुते यांना १९ हजार 0७0, वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना ४0५ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये शहर उत्तर मतदार संघात राम सातपुते यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले.
माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा मतमोजणी कक्षात पहिल्या फेरीत १४ पैकी एका मशीनला तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने काही वेळेसाठी मतमोजणी थांबली होती. यामध्ये पहिल्या फेरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत.
सकाळी ९ वाजता प्रत्यक्षात ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक फेरीला १५ ते २० मिनिटे लागत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR