22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमनोरंजनदुस-यांदा विवाह बंधनात अडकणार प्रतीक बब्बर

दुस-यांदा विवाह बंधनात अडकणार प्रतीक बब्बर

मुंबई : सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर दुस-यांदा लग्न करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगतेय. अभिनेता प्रतीक बब्बर नेहमीच बिनधास्त आणि मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. पण सध्या हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भरला संसार मोडल्यानंतर प्रतीक बब्बर दुस-यांदा बोहल्यावर चढणार असल्याची माहिती वा-यासारखी पसरत
आहे.

गतवर्षी व्हेलेन्टाईनच्या दिवशी या अभिनेत्याने आपल्या प्रेमाचा खुलासा करत तो अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला.या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे. प्रिया बॅनर्जी अभिनेत्रीबरोबरच मॉडेल देखील आहे. व्हॅलेन्टाईनच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत या दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे.
अभिनेता प्रतीक बब्बरने २३ जानेवारी २०१९ मध्ये सान्या सागरशी लग्न केले होते. लग्नाआधी हे दोघं एकमेकांना डेट करत होते, कालांतराने वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. लग्नाच्या वर्षभरानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.

प्रिया बॅनर्जी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत ‘जजबा’ चित्रपटात झळकली होती. उत्तम अभिनयाबरोबर मॉडलिंगमध्ये चमक दाखवणा-या प्रिया बॅनर्जीसोबत प्रतीक बब्बर लवकरच लग्नगाठ बांधेल अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR